ऋतू वसंत
ऋतू वसंत
1 min
206
ऋतू वसंत
मन पसंत
पक्षी गाती
मस्त रंगत
झाडा पालवी
ऋतू फुलवी
कोकीळ स्वर
मन भुलवी
मन वसंत
प्रीत संगत
मन मोहक
प्रेम फुलत
फुले फुलती
मुले खेळती
फुलपाखरे
भिर उडती
चंचल हवा
पक्ष्याचा थवा
उंच उडती
एक पारवा
शब्द जुळती
काव्य रचती
प्रेमी युगल
गीत म्हणती
