रोमांच
रोमांच
फुलाफुलापरी फुलुनी यावे,
जीवनात आपुल्या प्रेम फुलावे.
धुंद ही हवा, शीतल गारवा,
गोड अनामिक रोमांच फुलावे .
स्पर्श तुझा तो हवाहवासा,
मिठीत सखे मी तुझ्या भान हरावे.
भेटता तुला मन बहरूनी यावे,
रेशमी केसात मी तुझ्या हरवुनी जावे.
थंडीत गुलाबी तू जवळी असावे,
उबदार स्पर्श मला तो तुझा सुखावे.
जीवनगीत आपुले मधूर बनावे,
सप्तसूर सखे ते जुळुनी यावे.