तराणे
तराणे
संगीत जीवनाचे तुझ्यात पाहतो मी,
हरवुनी भान सखये तुजलाच शोधितो मी
सुरात हरवुनी त्या गीतात पाहिले मी,
गंधात त्या फुलाच्या तुजलाच शोधितो मी
रात्रीत पौर्णिमेच्या चंद्रात पाहतो मी,
सागर सरितेच्या मीलनात पाहतो मी
जीवन एक गाणे धुंदीतले तराणे,
गाण्यास आज सखये सोबत मागतो मी