रणरागिणी येसूबाई
रणरागिणी येसूबाई
1 min
218
त्रिवार वंदन करूनी
गाथा तिची मी मांडली
वीरांगना ही स्वराज्यासाठी
तीस वर्षे ओलीस राहिली //
जिवंत असूनही पती
विधवेची सोंगे काढली
पती निधनानंतर सोडून
दुःखे आभाळाएवढी झाली//
पुत्रप्रेम मागे सारून
स्वराज्यनिष्ठा तिने जपली
बसवून राजारामास गादी
कर्तव्यनिष्ठा ही राखली //
पडता वेढा रायगडी सर्वांना
स्वराज्यासाठी बाहेर काढली
राहूनी रायगडी शत्रूशी
मायलेकरं आठ महिने लढली
अशी ही रणरागिणी स्त्री
असूनही औरंगजेबशी भिडली
सलाम तिच्या सहनशीलतेला
पुन्हा ना या माती घडली. //