रणचंडिका
रणचंडिका
नारी तू सोज्वळतेची मूर्ती
रिती रिवाज संस्कृती जोपासणारी
अनंत कालची माता, गृहिणी असून
माया ममतेचा वर्षाव करणारी
पूर्वीचा काळ नाही राहिला गं
आज पावलो पावली संघर्ष येतो
निर्धाराने सामना करावा लागतो
तुला कठोर बनण्यास स्फुर्ती देतो
संघर्षाचा सामना करण्यास नारी
जागव तुझ्यातल्या रणचंडिकेला
जेथे तेथे हैवान तुझ्या वाट्याला
दाखव तुझे रूप त्या हैवानाला
शिक्षणाने, बुद्धिमत्तेने पुरुषांहुनी
सर्वोच्च शिखर गाठले तू कुवतीने
तरी स्त्री म्हणून तुझ्याकडे लोक
समाज पाहतो एका वेगळ्या दृष्टीने
समाजातले काही विक्षिप्त लोक
आज स्त्री एक भोग वस्तूच समजतात
कोवळी मुलगी ते प्रौढ बळी पडतात
रक्षणार्थ कोणीही पुढे येत नसतात
तूच हो स्वयंसिद्धा तुझ्या शील रक्षणार्थ
दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना
तुझ्या अस्त्र, शस्त्राचा वापर कर रणचंडिके
आणि छाटून टाक त्या हैवानी नराधमांना
अशा वेळे महाकाली, महारणचंडिके
वार कर त्या नराधमावर मेला तरी बेहत्तर कायदा तूच घे हातात कारण सुप्रीम कोर्टात त्यांना सोडलं जातं अन् पुन्हा गुन्ह्यास ते कट्टर
आता नाही गप्प बसायचं सोक्षमोक्ष लावायचाच
नजर, स्पर्श ओळखून जबर प्रतिकार करायचा
जुडो, कराटेचा उपाय वापरून शील रक्षणार्थ
त्या हरामखोरांचा सूड रणचंडिकेनच घ्यायचा
