रंग तुझा माझा
रंग तुझा माझा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
216
रंग तुझ्या इशा-याचा
रंग नजर खिळण्याचा
रंग माझा हुलकावणीचा
रंग तुला पिळण्याचा
रंग तुझ्यात प्रेम भरण्याचा
रंग तुला सर्व देऊन उरण्याचा
रंग तुझ्या गावाचा
रंग मनात असलेल्या नावाचा
रंग तुझी वाट पहाण्याचा
रंग तुझ्यात झुरण्याचा
रंग तुला जिंकुण देण्याचा
रंग मी जिंकुण हरण्याचा
रंग तुझ्या विचाराचा
रंग तुझ्या आठवणीचा
रंग सुखदुःखाच्या साथीचा
रंग प्रेमाच्या पाठवणीचा
रंग फुलणा-या प्रितीचा
रंग तुझ्यामाझ्या किर्तीचा
रंग पसरला चौफेर
रंग हिरवा धरतीचा