पंढरीनाथ
पंढरीनाथ
1 min
5
-
देव माझा हरी! निवास पंढरी
संत वारकरी! पंढरीत || 1
अनाथांचा नाथ! विठ्ठल माऊली
भक्तीमय झाली! चंद्रभागा|| 2
पंढरीची वारी! भक्तांचा हा मेळा
कपाळाला टिळा! शोभतसे || 3
भक्त पुंडलिक |माय बाप सेवा|
थांबविले देवा विटेवरी || 4
संत कान्होपाञा| भक्तीलीन झाली
देवा जागा दिली || मंदिरात 5
भक्तांसाठी थांब |उभा विटेवरी
कर कटेवरी| ठेवुनिया ||6
संत जनाबाई | विठु तिची आई |
धावतसे जाई| संकटात ||7