फुलायचे होते
फुलायचे होते
1 min
7
फुलायचे होते जेव्हा मला
सुगंध तुझा गेला सरून
आज एक मागते अधिकार
तुला पाहु दे फक्त दुरुन
आठवणी शिंपल्यात बंदिस्त
मोती होऊन आले मोहरून
ताठ ऊभी खडका समान
भेटुन लाट गेली ओसरून
कथा आपल्या दोन जीवाची
गेली भव-यात गुरफटून
वाचता वाचता तेव्हा कळाले
गेले पान आखरी उलटुन
तुला मानिले सखा प्रियकर
तशी मी तुझी कोणीच नसुन
वाट पाहिल जन्मजन्मांतर
मनात तुझ्या जाईल ठसुन