रंग प्रेमाचे
रंग प्रेमाचे
1 min
34
प्रेम उत्कट भावना कसे करु गुणगान
सुखदायी असे भाव मिळे मना समाधान
आई लेकराचे प्रेमभावा बहिणीची माया
वडिलांची सर्वांवर कर्तृत्वाची प्रेम छाया
मित्रत्वाचे प्रेम रंग जैसा कृष्ण सुदाम्याचे
सख्या सोबतीचे प्रेम आपुलकी विश्वासाचे
देशभक्तांनी अर्पिले प्राण पणाला लावूनी
देश प्रेम भाव होता मनी भरला ठासूनी
निसर्गाचे धरेवर प्रेम वसे सदा काळ
दावी तो बहु रंगात घडे आशेची सकाळ
प्रेम दिसे देवाचेही त्याच्या भक्तांवर असे
गाथा तारुनिया दिल्या भक्तीरंगी प्रेम दिसे
