STORYMIRROR

Rupali Gojwadkar

Others

3  

Rupali Gojwadkar

Others

रंग बरसे

रंग बरसे

1 min
189

रंग आयुष्याचे

आयुष्याचे रंग वर्णावे

  किती आणि कसे?

  जशी आपली दृष्टी 

  जाणवतात रंग तसे !

  प्रत्येकाचा भाव निराळा

  स्वभाव तर त्याहुनी आगळा

 तरी साजरा करावा लागतो

 आनंदाने जीवन सोहळा .

 जाणून घ्यावात सहानुभूतीने

  सर्वांच्या भावभावना

  समजून घ्याव्यात प्रत्येकाच्या 

 जगण्याच्या परिकल्पना.

 जलाप्रमाणे असावे निर्मळ 

 सदैव आपले मन

 हाच आहे कानमंत्र

 सुखी करण्या जीवन.

  रंग जाणून आयुष्याचे

  आनंदाने जगावे

  'अंतीम सत्य' ध्यानात ठेवून 

  प्रेमाचे अत्तर शिंपडावे.

  रंगात या सर्व रंगून

  आयुष्य होईल सुखाचे

   मग प्रश्नच उरणार नाहीत 

   आयुष्यातील द्वंद्वांचे...


Rate this content
Log in