स्त्री - निसर्गाचा आविष्कार
स्त्री - निसर्गाचा आविष्कार
1 min
481
स्त्री म्हणजे सृजन
स्त्री म्हणजे स्वावलंबन
स्त्री म्हणजे निसर्गाचे
सुरमयी गुंजन....
स्त्री म्हणजे कर्तृत्व
स्त्री म्हणजे नेतृत्व
स्त्री म्हणजे दातृत्व
स्त्रीलाच बहाल केले
निसर्गाने मातृत्व...
स्त्री म्हणजे वात्सल्य
स्त्री म्हणजे कौशल्य
स्त्री म्हणजे मांगल्य
स्त्री मुळेच टिकून आहे
विश्वाचे साकल्य....
स्त्री म्हणजे दृढता
स्त्री म्हणजे सुकुमारता
स्त्री म्हणजे तत्परता
स्त्रियांमुळे जपली जाते
नात्यांमधील आत्मीयता...
स्त्री म्हणजे आचार
स्त्री म्हणजे विचार
स्त्री म्हणजे संस्कार
स्त्री विना नाही
संसारास आधार...
