आई
आई
1 min
182
निसर्गदत्त अद्भूत दान
देते ती जन्माचे वरदान
आई म्हणती कुणी तर
कुणी पुकारती माय
जिच्यामुळे लेकराचा
जन्म सार्थकी लागतो
मातेच्या पदस्पर्शाने
स्वर्गसुख तो अनुभवतो.
धन्य ते लेकरू जगती
मिळवी आशिष जननीचा
सांसारिक सुखाची प्राप्ती
लाभे संस्कार जगण्याचा.
माता, जननी, माय, आई
अनंत रूपे ममतेची
देई घासातला घास
साही कष्ट दरश्वास....
