STORYMIRROR

Rupali Gojwadkar

Others

3  

Rupali Gojwadkar

Others

मकरसंक्रांती

मकरसंक्रांती

1 min
199

  तीळाची स्निग्धता

  नात्यात रुजावी

  गुळाची गोडी

  वाणीत पाझरावी


  संस्कृतीची महती

  सर्वांनी स्मरावी

  भारतभूमी सदैव 

  तेजाने उजळावी

   

  संक्रांतीची संक्रमणे

   नित्यस्मरणात रहावी

   फिरुनिया पुन्हा

   मतमतांतरे न व्हावी


   विसरूनी भेदभाव

   किल्मिषे सारी

   अंतःकरणी निरंतर

   प्रेमभावना साकारी


Rate this content
Log in