आनंद
आनंद
1 min
245
आनंदरूपी अत्तर नेहमी
जपावे मनाच्या कुपीत
समाधानी आयुष्याचे
हेच खरे आहे गुपीत.
शिंपडत राहावे सतत
दुःखीकष्टी माणसांवर
भरूभरून सुगंध येतो
आपल्याही कायेवर.
आनंदाचे हे अत्तर
जपावे मनी निरंतर
देत राहता वाढत राही
असे उलट गुणोत्तर .
साधे सोपे गणिती सूत्र
आनंद द्विगुणीत करण्याचे
निरपेक्षपणे देत राहावे
सुटेल कोडे जीवनाचे...
