महिलादिन- नारीसन्मान कायम जपा
महिलादिन- नारीसन्मान कायम जपा
1 min
645
नका करू साजरा
केवळ एक दिन महिलांचा
वर्षभर जपा सन्मान
तमाम स्त्री शक्तीचा..
कामगार असो वा कर्मचारी,
किंवा असो ती गृहिणी
अहोरात्र कष्टत राहते
संसारासाठी मानिनी..
काळानुसार बदलल्या स्त्रिया
होत आहेत आत्मनिर्भर
मनःपूर्वक द्या प्रोत्साहन
साकारण्या त्यांचे स्वप्न..
सर्वांनी घ्यावी दखल
स्त्री वर्गाच्या कष्टाची
खरी गरज आहे ही
बदलत्या समाजाची..
भावभावना जपून तिच्या
बनेल संवेदनशील समाजमन
तोच खरा नारीसन्मान
तोच खरा महिलादिन...
