कोरोना
कोरोना
1 min
293
कोरोनाची पसरली साथ
चला लावूया रोगाची वाट
आजारापेक्षा प्रतिबंध बरा
नका देऊ विषाणूला थारा
सर्वांनी घ्या काळजी स्वतःची
करू नका हो हलगर्जी
सर्दी, पडसे ठेवा दूर
शिंकताना घ्या दक्षता पुरेपूर
स्वच्छतेच्या सवयी पाळा
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
रोग प्रसारास दूर सारा
रूमाल अथवा मास्क वापरा
सॅनिटायझरचा वापर पाहून
कोरोना जाईल दूर पळून
या विषाणूची नको चिंता
निरोगी राहील सर्व जनता...
