रम्य ते बालपण
रम्य ते बालपण
1 min
380
बालपणीचा काळ हा
मज वाटतो सुखाचा
खोड्या असती अमाप
ठेवा असे आनंदाचा ||१||
निरागस बालपणी
नसे कशाचे बंधन
बालपणीचा काळ हा
आठवणींचे आंदन ||२||
बालपणीचे दिवस
आठवता येई पाणी
सवंगड्यांच्या साथीची
अधुरी एक कहाणी ||३||
झालो सारे मोठे असे
हरविले बालपण
मागे वळूनी पाहतो
रम्य ते बालपण ||४||