रक्ताची नाती
रक्ताची नाती
1 min
228
अशी कशी ही नाती
निर्माण केली देवाने
दुरावली सारी नाती
नात्यातील अविश्वासाने ||१||
नात्याशिवाय नसे काही
मौल्यवान गोष्ट या जगात
आपलेच येऊन उभे राहती
परक्यासारखे दरवाजात ||२||
बनविले रक्ताचे नाते ईश्र्वराने
दोर दिली आपल्या हातात
सांभाळ कर सार्या नात्यांचा
न येवो दुरावा रक्ताच्या नात्यात ||३||
मौल्यवान लाभली नाती
मनुष्यरुपी जीवनात
निभवू चला सारे
रक्ताची नाती आनंदात ||४||