रक्षाबंधन
रक्षाबंधन


भाऊराया उभा माझा
तिथे सीमेवर लढायाला,
कधीच नाही बांधली राखी
मी त्याच्या कराला...
तरी निभवतो आपले कर्तव्य
तो न चुकता प्रत्येक क्षणाला
सांगा आहे का नाही गरज
त्याला या सणाच्या आमंत्रणाला?
आज संपूर्ण देश
लढतोय त्या कोरोनाच्या महापुराला
तिथे तटस्थ किती भाऊरायांना
बांधली होती ही कर्तव्याची माया?
रक्षाबंधन हे सण घ्या समजून
आणि सांगा समजावून लोकांना
प्रत्येक मदतगारास
होतीच का ही बहीण
राखी बांधायला?
तरी आला धावून तो भाऊराया
आपल्या कर्तव्याला तो जागला
एक क्षणही न घालवता वाया
त्याने वाचविले किती प्राण किती काया...
चला मग आता आली वेळ
या रेशीम धाग्यात गुंडाळूया
काही आपुलकीची माया
पोलिस, डॉक्टर, इतर सर्व कर्मचारी,
अशा भाऊरायास पाठवुया काही शुभेच्छा
या रक्षाबंधनास खऱ्या अर्थाने
निर्माण करुया बंध माणुसकीच्या...