रात्र सरली
रात्र सरली
1 min
194
रात्र सरली
प्रभात झाली
पक्षी उडाले
उषा जागली ...१
पूर्व दिशेला
रवि दिसला
किलबिलाट
पक्षी उडाला......२...
हार फुलती
देवाचा स्मूर्ती,
भक्ती भावाने
चर्णी अर्पिती......३
पाणी आणण्या
सखी साजण्या
नदिच्या काठी
फुले तोडण्या.......४
हार गुंतती
देवा वाहती
पुजा करुनी
भक्ती अर्पिती........५
भक्ती जनानं
शुद्ध मनानं
गीत ती गाते
प्रसन्नतेनं........६
चित्त असावे
कष्ट करावे
गोरगरिबां
दान ते द्यावे.
ग्रंथ वाचावे
ज्ञान वाटावे
सकल लोकां
शिक्षण द्यावे.......८
गर्व नसावा
लीन असावा
मवाळपणे
शब्द बोलावा........९
पैसे कमवा
थोडे साठवा
परोपकार
थोडा करावा.........१०
