रामनवमी
रामनवमी
रामाच्या नावाचा गजर |
अयोध्येत गरजला ||१||
मर्यादा पुरुषोत्तम राम हा |
अयोध्येमध्ये वसला ||२||
खरा राम नको कोणाला |
खरा मर्यादा पुरुषोत्तम नको कोणाला ||३||
मर्यादा पुरुषोत्तम हे नाम जगी प्रसिद्ध झाले |
हनुमानाने त्यांना आपल्या हृदयात बसविले ||४||
नाम राम आहे |
देव लोकांचा आहे ||५||
वनवास केला रामाने |
सीतामाता सोबती असे ||६||
राम असे प्रेमाचा प्रतिक |
सर्व जीव लावे त्यांवर ||७||
जन्म सार्थक करूया |
गाऊनी राम नाम जपुया ||८||
करूया गजर आज रामाचा |
नाश होईल सर्व संकटाचा ||९||
रामाला आजच्या दिवशी करूया प्रार्थना |
सर्व संकटे परिस्थिती सुदृढ करूया ||१०||
