STORYMIRROR

Swati Mali

Others

4  

Swati Mali

Others

रामार्पण

रामार्पण

1 min
7


रामाविण नाही

आणिक ते काही

अवघाचि भार

रामराया वाही...१

तन-मन -धन

झाले रामार्पण

राम चरणाशी

सारे समर्पण...२

नामस्मरणात

मन झाले दंग

रंगले रंगात

रंग तो श्रीरंग....३

न काही उरली

या मनाची आस

ध्यानी -मनी -चित्ती

फक्त तुझा ध्यास...४

रघुनंदनाची

अखंडीत सेवा

सदैव लाभावा

आनंदाचा ठेवा...५


सौ.स्वाती रामचंद्र कोरे.

सांगली


साहित्याला गुण द्या
लॉग इन