STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

राम नवमी

राम नवमी

1 min
454

भगवंत श्री विष्णू घेती सातवा अवतार

चैत्र शुध्द नवमीला मध्यान सुमाराला

होऊनी कौसलेचा सुत 'प्रभू श्रीराम '

संहार करण्या राक्षस कुळाला.


सर्वगुण संपन्न पुत्र तो राम कौसल्येचा

बाळपणी हट्टी करी चंद्रघेण्या मांडीवरी

आरसा मांडीवर देऊनी दायी पुरवी हट्ट

श्रीराम खेळला चंद्र धरुनी आरशावरी.


बाळां घेऊनी जाई गुरु श्रेष्ठ विष्वामित्र

जेथे रचले सीता स्वयंवर जनक राजानी

बलाढ्य रावण उचलू न शके 'शिव धनुष्य'

दोन तुकडे झाले त्याचे हाती घेताच रामानी.


स्वयंवर जिंकुनी सीता झाली भार्या रामाची

स्वागत करण्या दंग झाली प्रजा सीतारामाची

द्विप पताकांनी सजली सारी अयोध्या नगरी

दशरथ राजा स्वप्न पाहे राम राज्याभिषेकाची.


मंथरा देई आठवण कैकयेला दशरथ 'वराची'

भरत पुत्रा राज्य मागोनी पाठवी रामा वनवासी

चौदा वर्षे राम वनवासात एका वचनपुर्तिसाठी

पुत्र वियोगाने राजा दशरथ सोडी प्राणासी.


 रेषा पार करी सीता,रावण नेई तिला लंका

लंकापती रावण ठेवी सीतेस अशोकवनी

राक्षस वृती असूनही जपे तो स्त्री चारित्र्य

असूर असुनही पहा त्याची संस्कृती रामायणी.


खारूताई ही मदत करी रामसेतूसाठी

हनुमान वानर सेनासह राम लढे रावणाशी

रावणाचा वध करुनी, येई घेऊनी सीतेला

वनवास संपुनी सीतेसह परतुनी येई घराशी.

       


Rate this content
Log in