STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Others

3  

Mahananda Bagewadi

Others

पुस्तक

पुस्तक

1 min
376

जन्म पुस्तकाचा, कोठून झाला?

उत्तर त्याचे, आहे ठाऊक कुणाला?

निर्मितीचा धनी, लिहिणारा आहे

लेखक पुस्तकाची, जननी आहे,

चांगल्यासाठी जन्म पुस्तकाचा

जाना पुस्तक माणसाचा,

मार्गदर्शक माना एक,

एक शब्द, अर्थ त्यांचे अनेक

ग्रंथ लिहिले गेले झाले थोर नेक,

पुस्तकाची महती, जाणतो प्रत्येक

वाचावे पुस्तक, लिहावे लेख

बुद्धीची, शुद्धी, वाचल्याने होते

विचारांना दिशा, गती मिळते,

पुस्तक आवर्जून वाचावे रोज

चालूच ठेवावी ज्ञानाची खोज,

वाचावे एकचित्त होऊन मनी

घडतील रत्न अनमोल, गुणी.

पुस्तक मित्र आपला खरा,

अवगुणी सहवासापेक्षा तो बरा,

वाढवतो आपुले सामाजिक ज्ञान,

समाजात मिळवून देतो मान.


Rate this content
Log in