पतंग
पतंग
शोभिवंत तू विविध रंगात
लहान मोठे अनेक आकार
दोन साध्या काड्या जोडूनी
झाले बघ तव रुप साकार
हलका फुलका तू नाजूक
होतो वाऱ्यावरती स्वार
उंच गगनी घेत भरारी
क्षणात ढगांना करिशी पार
दोरीची तुजला सदा साथ
जीवन नौका तिच्या हातात
संभाळीते तीच तव भार
करविते सफर गगनात
मधूनच डोकावी ढगातूनी
थंडगार सुखकर वा-यात
दिसे तव रुप अती मनोहर
भासे विहरता खग नभात
कधी मारीशी सूर नभी
जशी मासोळी पाण्यात
लगेच तो-यात मान काढूनी
सर सर भरारी घेतो गगनात
तुटता दोरी , सहवेना विरह
भरारी घेत रममाण नभात
सुटता दोरीची साथ तुझी
हताश होता दोघे क्षणात
