परतीच्या वाटेवर
परतीच्या वाटेवर
1 min
20.6K
परतीच्या वाटेवर आज..
अनोळखी वाटले..
ओळखीचे काही क्षण..
जरी तिथेच होते गुंतले..
रोज सारे क्षण इथे..
कट्ट्यावर जाई..
आज मात्र परतीची..
वाटत होती घाई..
तिथली एक एक आठवण..
मला छळत होती..
मी एकटा धावत होतो अन ती
माझ्या मागे पळत होती..
परतीच्या वाटेवर वाटले..
मागे वळून पहावे..
आपले कुणी मागे राहिले..
त्यांना सोबत घ्यावे..
कळत नव्हते आज मला..
असे का वाटत होते..
परतीच्या वाटेवर आज..
मन दाटून येत होते..
