STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

प्रॉमिस.....

प्रॉमिस.....

1 min
287

लाखात एक तूच दिसे 

पाहताच तुला मन हसे

माझा जीव जडला तुझ्यावर 

तुझ्या नकट्या नाकात मी 

सोन्याची नथ घालीन...


तुला करतो प्रॉमिस तुझा होईन 

सांग तुझ्या ईच्छा मी पूर्ण करीन...


माहीत मला की तुला 

आवड साड्यांची 

लातूरमध्ये आहे ग माझी 

खोली भाड्याची 

तुझ्या नाकारात होकार माझा 

तू सांगशील तिकडे उभा राहीन...


ऐकलं मी की तुला आले 

लांबून लग्नाचे मागणे 

त्याचा हात धरू नको हेच 

माझे सांगणे 

राग धरू नको मीच तुला 

खुश करीन...


तुझ्यावर लिहून आज 

संगमचं नाव झालं शहरात 

जीव जाईल तरीही तूच 

राहशील माझ्या उरात 

तुझ्या डोळ्यातली प्रत्येक 

गोष्ट मीच पाहीन..


साहित्याला गुण द्या
लॉग इन