प्रितीचे लागले वारे....
प्रितीचे लागले वारे....
1 min
332
नाचती माझे मन
जैसे आकाशातील तारे ।
बेधुंद झालाय हा सखे याला
प्रितीचे लागले वारे ।।
करतो तुझेच स्तवन याला
तमा नसे कोणाची ।
बेचैनी फार वाढली गं
तुझ्यासाठी माझ्या मनाची ।।
रंगवले माझ्या मनाने
चित्र आपल्या प्रितीचे ।
तुझ्या लावण्याने सखे
शुद्ध हरपले माझ्या मतीचे ।।
झाली कवी तुझ्यापायी
कवनावाचून काही सुचेना ।
न पाहता तुझे रूप
खाणे, पिणे काही रुचेना ।।
जशी येतेस स्वप्नात नित्य
तैसेचि यावे आयुष्यात ही ।
जैसे फुलले माझ्या अंतरी प्रित
तैसेचि फुलावे तुझ्यात ही ।।
