परी
परी
1 min
429
परी ग परी
माझी तू सोनपरी
गुणी माझी मुलगी
आहेस ना बरी.....
बाबांची तुला चिंता
आईची तुला काळजी
भाग्यवान मी आहे
तू माझं बाळजी.....
लहान तू होतीस
खूप छान दिसायची
लाल लाल फ्रॉक घालून
गालात च हसायची....
गुबरे गुबरे गाल तुझे
नकावरती राग
थोडा आवाज झाला तरी
येई तुला जाग.....
परी माझी परी
आहेस किती गोड
आई मुलीच्या नात्याला
नाही जगी तोड...
