STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

4  

Sangam Pipe Line Wala

Others

प्रेमाचा बंगला

प्रेमाचा बंगला

1 min
400

तू बांध गं तुझ्या प्रेमाचा बंगला 

तुझ्याविना मी आहे एकटा चांगला....


तू माझ्यासाठी काही नको करू 

तू जग मस्तीत नको इतकं झुरू 

तुझी पाहून मस्ती हा जीव दंगला.....


तू इतकी चांगली ना मी नाही वेडा 

आवडतं होता तुझ्या नाकातला खडा 

आता तुझा गं जीव कोणासाठी पांगला.....


अगं एखाद्या राणी सारखी वागतेस 

सांग मला सोडून कोणासाठी जागतेस 

काय नावं ठेवलं राणी तुझं कोणी मंगला.....


संगम आहे तुजविन एकटा खूप सुखी 

तुझ्या प्रेमात झालो होतो मी खूप दुःखी 

आज सारा रंग मी आहे कवितेत रंगला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन