प्रेम
प्रेम
1 min
147
प्रेम नेमकं काय काही कळेना
आणि कुणी बाई मला ते सांगेना
माता प्रेम करी बाळावर सदा
बाळ ही प्रेमाने असतो सुखदा
मुले प्रेम करतात विद्येवर
तिच पोचतात त्या शिखरावर
कोणी करी दीन दुबळ्यांची सेवा
त्याला मिळे लोकांच्या प्रेमाचा मेवा
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे अशी रीत
असे ती ही एक प्रकारची प्रीत
देव प्रेमापोटी देेई भक्तां भेट
भक्तां ह्रदयी देव ही असे थेट.
