प्रेम म्हणजे काय असतं
प्रेम म्हणजे काय असतं
प्रेम म्हणजे काय असतं, सांगणे कठीण असतं
ज्यांनी अनुभव घेतला त्यांनाच कळत असतं
प्रेम प्रत्येकाचे वेगळ्या भावना व्यक्त करते
प्रेम हे निव्वळ प्रेम असतं कधीच स्वार्थी नसतं.
आई बाळाचे प्रेम हे माया ममता वात्सल्याचे
ह्याची तुलना जगी कुणाशी होऊ शकते?
गुरु-शिष्याचे प्रेम आदर युक्त आणि ज्ञानार्जनाचं
आई वडिलांचेे प्रेम संस्कार बिंबवण्याचे असते.
पशू-पक्षी,वृक्ष-वेली वनचरे साऱ्या निसर्गावर
प्रेम हे एक प्रर्यावरण व निसर्ग संरक्षणार्थी
तसेच सैनिकांचे आपल्या देशावरचे प्रेम निव्वळ
निःस्वार्थी जननी जन्म भुमीच्या रक्षणार्थी.
माणसा माणसातलं प्रेम नात्या गोत्यांचे प्रेम
आपुलकीचे सर्वांना एकजुटीनी सांभाळण्याचे
दीन दलीत पिडीतांसाठी प्रेम एक माणूसकी
धर्म आणि निःस्वार्थी दया कृपा जोपासण्याचे.
प्रेम, प्रेम असतं तुमचं आमचं समान असतं
असं मुळीच मानायचं व समजायचं नसतं
प्रेम, प्रत्येकाचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे
प्रसंग व परिस्थितीवर अवलंबून असतं
