प्रेम म्हणजे काय असते
प्रेम म्हणजे काय असते
1 min
434
ए मुलांनो शिकायला किंवा कामावर जाताना
अशा उपाशीपोटी जाऊ नका रे
काहीतरी घरातून खाऊन जा
एक आई आपल्या पोरांना म्हणते
आईचं म्हणणं कधीतरी आयका रे
काय असते आईची माया
हे तुम्ही मुलांनो केव्हा समजणार रे
आई ती आईच असते
ती स्वतः उपाशी जरी राहिली
तरीसुद्धा तिचे मन आपल्या
लेकराला खाऊ घातल्याशिवाय
ऐकतच नाही
हीच असते आईची माया
ती असल्यावर तिची किंमत
कोणीच समजत नाही
आई नसल्यानंतर या जगात
कोणीच असे म्हणणार नाही तुम्हाला
अरे असे किती काम करता मुलांनो
एक घास तरी खाऊन जा
हेच आईचे प्रेम असते
