पोवाडा
पोवाडा
प्रथम नमन करून अंबेला
शंभू देवाला ज्योतिबाला
गणेशाला खंडोबाला
शिवाजीराजांच्या लिहिते
पोवाड्याला
जी रं जी जी
शाहिस्तेखान आला बघा पुण्याला
लाल महाली ठोकले मुक्कामाला
त्याच्या फौजेने तळ बघा दिला
दोन वर्षाचा काळ उलटला
ओढून नेही गुराढोरांना
नासधुस करी शेताला
मुलुख उध्वस्त त्याने केला
जी रं जी जी
शिवाजीराजांनी ठरवले मनाला
शाहिस्तेखानाची खोड मोडण्याला
शिवरायांनी धाडसी बेत बघा केला
महालात रात्री शिरावे मध्यानाला
एकाक्षणी उडवावे मोघलाला
असा बेत शिवरायांनी केला
जी जी रं जी
होता शाहिस्तेखान गाढ झोपला
भगदाड पाडले वाड्याच्या भिंतीला
पहारेकरी पेंगत होते त्यावेळेला
संधी साधून महालात प्रवेश केला
मार मार मारले शत्रूसैन्याला
जीजी रं जी
तेवढ्यात शाहिस्तेखान जागा झाला
सैतान सैतान म्हणत खिडकीवाटे पळू लागला
तेवढ्यात शिवाजीराजांनी वार बघा केला
कापले शाहिस्तेखानाच्या बोटाला
अल्ला अल्ला म्हणत जीव मुठीत
घेऊन पळाला जी जी रं जी
शिवाजी राजांनी शत्रूवर जरब बसवली होती
केली शाहिस्तेखानाची फजिती
महाराष्ट्रात विजयाची तोफ उडाली होती
सारी प्रजा आनंदित झाली होती
जी रं जी जी
