फुलपाखरू
फुलपाखरू

1 min

238
मी होणार फुलपाखरू
नील नभी फिरणार
साथीदारांसमवेत मजेत
इकडे तिकडे उडणार.....
रंग माझे असतील वेगवेगळे
नाजूक ठिपके पंखांवरती
ऐटीत मिरवेन दाहीदिशातून
अलगद झोके घेईन फुलांवरती....
या फुलावरून त्या फुलावर
झुळकन सुळकन मजेत जाईन
मुलांच्या समोर पिंगा घालीन
मुलांची मस्त मजा पण पाहीन...
मुलं येतील मला पकडायला
मी मुलांना नाही सापडणार
पटकन हुलकावणी देईन मुलांना
मुलांच्या पुढे मीच धावणार...