Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka Shinde Jagtap

Others

3  

Priyanka Shinde Jagtap

Others

फुकटची नशा, बदलते दिशा

फुकटची नशा, बदलते दिशा

1 min
254


दारू, सिगरेट, गुटखा, पान

महागात पडेल त्यांची आसक्ती,

पुनःश्च कर विचार, घडव सुधार

आयुष्यसंवर्धना कर व्यसनमुक्ती... १


का उगी हा वायफळ अट्टाहास?

दारू जाळते भल्या-भल्यांना, 

आजारांना धाडी खुले आमंत्रण

कशाला देता स्वतःला या यातना?... २


यकृतास कशाला द्यावी ही शिक्षा?

फुकटच्या नशेपायी तुटतो संसार,

चालण्याची दिशा बदलते दशेत

घ्यावा लागतो मग उसना आधार... ३


चिंताग्रस्ततेत भरकटल्या पायवाटा

मृत्युकडे झुकत चाललेला हा कल,

व्यसनाधीनतेत कित्येक गेले बळी

दृष्टिकोन बदलावा, होईल बदल... ४


तरूणांनी घ्यावा यातून एक धडा

पौष्टिक आहाराने आरोग्य वाढवा,

विनाकारण दारू नका करू सुरू

आदर्श पिढीला शिक्षणानेच घडवा...५


Rate this content
Log in