फणसाचे गरे
फणसाचे गरे
1 min
314
गोड फणसाचे गरे
खायला लागते छान
नानाविध फ्लेवर होते
वाढवते कोकणाची शान...!!१
सानथोरांसह आवडते
जॅम बनते याचे भारी
बाहेरदेशातही मागणी
फिदा आहे दुनिया सारी....!!२
वरून काटेरी फणस
आत गोड फणसाचे गरे
नसेल खाल्ले कोणी तर
खाऊनच बघितलेले बरे....!!३
नानाविध यांचे उपयोग
गरे आरोग्यास गुणकारी
मनसोक्त खा उन्हाळ्यात
निसर्गाची किमया भारी...!!४
पिवळे फणस गरे पाहून
तोंडाला सुटले पाणी
कोरोनामुळे मुकलो खाण्यास
आठवणीत लिहिते गाणी...!!५
