STORYMIRROR

उमेश तोडकर

Others

3  

उमेश तोडकर

Others

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
224

असा काही पडलास तू की, पिकावर जशी फवारणी करावी

एैन जुन महिन्यात तुझी, सातत्याने गरज पडावी 

असा काही तानलास तू की, रोज तुझी आठवण व्हावी

प्रत्येक दिवशी येशील तू, याची आस आम्हाला लागावी 

अखंड महीना लावलीस तू, ओढ तुझ्या बरसण्याची

जुन संपुन जुलै आला, तोही निम्मा संपुन गेला 

हळव्या आमच्या मनाचा बांध, आकांताने फुटून गेला

तेवढ्यात तुझे झाले आगमन, ओले चिंब झाले तन मन 

आता असा काही पडतोस तू, हवा आहेस जसा आम्हाला

सरीवर सरी संगे हळूवार, धरतीला कवेत घेतोस तु 

रिमझिम रिमझिम सरीने, थेंब थेंब जमिनीत साठवतोस तु

जिवंत झ-यासंगे पाण्याच्या, धरतीमधुन वाहतोस तु 

पाण्यासाठी फिरत होतो दाही दीशा, आता मात्र पाणीच पाणी दाही दीशा

असाच रोज पडत जा, करून टाक धरती

ओली चिंब पाणी पाणी होवू दे सर्व, तुझ्या थेंबात न्हावू दे हिरवा निसर्ग


Rate this content
Log in