पाऊस
पाऊस
येन राजा पावसा आता, तू काहून असा करतं
दरवर्साले राजा आमची, बिनापाण्यात हजामत करतं
पहिले आला मिरगात, आता सपा चाट देली
वावर पेरल समदच, खुरपळीन गचांडी लेका देली
दोन येळ पेरुन झाल, तेच्यावर तू आला लेका नाही
आमी पायतो वरते, तुले जराशीबी कदर नाही
वावर ठेवशीन काय कोरं, अवंदाकी देशीन झाराझुरा
इंजीनियरिंगले पाठवा लागते, अवंदा मया पोरा
कोणाच कोणतं अन् ,कोणामांग काम काही
कोणाच्या घरी लगिन तं, कोणाची बिमार माई
मिरग गेला अर्दळा गेला, आता आला पुक
काहुन मारतं बिनापाण्यानं, येवूदे पिक साजुक
चुकल हाय आमचतं, आमची चुक पदरात घेना
केली झाड लावायले सुरुवात, आता थेंब पाण्याचा देना
आमीत फकत धुऱ्यावरचेच, झाड राजा कापले
सरकारी ठेक्यात ठेकेदारयन, अख्खे जंगल सपा केले
तेयची सजा आमाले काहून, तुही करतं बकरीवर बिसमिल्ला
सरकारही बोंबलते, तेही करते आमालेच कल्ला
बळीराजा नाव ठिवल, काय माहित कोण्या बुव्हाऱ्यानं
राजात नाही नुस्ता गेला बळी, बी टाकता काकरांन
