STORYMIRROR

उमेश तोडकर

Others

3  

उमेश तोडकर

Others

पाऊस महिना

पाऊस महिना

1 min
241

आला जेष्ठातील श्रेष्ठ पाऊस, करा सुरवात पेरणीला

चिंब ओल्या सरीसंगे भिजुन, करा सुरवात तिफनिला

एक एक सर पडू दे अंगावर, एक एक बीज रूजु दे रानभर

होईल पावसात भिजत, शेतक-याची पेरणी शिवारभर

येईल जेष्ठानंतर आषाढ,बिज मातीत रुजवायला

उमलुनी बिजातुनी अंकुर, त्याचे रोप व्हावयाला

बरसतील आषाढाच्या सरीवर सरी, येईल पिकाला जोमानं उभारी

डोलेल पीकं वा-याच्या लहरीवरी, करतील स्वागत त्याचे पावसाच्या सरी.

पडतील पावसाच्या सरीवर सरी, पीक वाढेल इंचा इंचा परी

खेळतं ऊन पावसासी खेळ, येईल आषाढा बरोबर श्रावण

ऊन पावसाच्या खेळात, होईल पीकांना आनंद

श्रावणाच्या सरीबरोबर, पिक मास गर्भाला येईल

अध्यात्माच्या महीन्यासवे, शेतकरी राजा सुखावेल

श्रावण भाद्रपदा सवे, पीक कापणीला येईल.

डौलदार पीक शेतात पाहूनी, शेतकरी राजा सुखावेल

भाद्रपद- अश्विन येईल,कापणीची लगबग होईल

धन-धान्यांच्या राशी, शेतक-याच्या घरामधी साठतील

येणारा दिवाळीचा सण, पावसाच्या निरोपासंगे आनंदून जाईल.


Rate this content
Log in