पाऊस अंगण
पाऊस अंगण

1 min

41
रिमझिम पाऊस पडू लागताच
कवी मन मोहरते काव्य रचण्यात
नाचू गाऊ कवितेच्या अंगणी
वेगवेगळ्या त्या रचलेल्या काव्यात.
तुडुंब भरते अंगण पाऊस पाण्याने
काव्य ही स्फुरते वेगवेगळ्या रचनात
चारोळी, आठोळी, अष्टाक्षरी,षटाक्षरी
नाचू गाऊ कवितेच्या ह्या अंगणात.
शब्द शब्द जुळून येती ओठावरती
क्षणात उमटती लेखणीद्वारे पटावर
अचानक ती कविता बनली जाते
नाचू गाऊ त्या पावसाच्या कवितेवर.
मेघांनी कोसळावे झरझर श्रावणात
हिरवे हिरवे गालीचे उगवावे धरावर
दुधाळ झरे वाहतील कड्यावरुनी
नाचू गाऊ त्या कवितेच्या तालावर.