पाणी
पाणी
1 min
374
झाला होळीचा सण
सण घेऊन आला
उष्ण गरम हवा
हवा झोमे अंगाला
तहान ती लागेल
लागेल ती सर्वांना
झाडे आम्ही कापली
कापली हिरवाई.
आता दोष कुणाचा
कुणाचा जरी असे
तरी पाणी टंचाई
टंचाई सर्वां भासे.
झाडे लावा जगवा
जगवा लता वेल
येईल घन काळे
काळे देईल जल.
पाण्याचे महत्तव
महत्तव कळावे
सामान्य लोक जना
जना पाणी जपावे.
कमी वापरा पाणी
पाणी हेच जीवन
नीट वापरा पाणी
पाणी समजा धन.
