पांडूरंगा
पांडूरंगा
1 min
528
देव माझा
पाडुरंग
वारीत मी
होई दंग.......१
नाम घेता
विठ्ठलाचे
सुख लाभे
संसाराचे........२
विठोबा तो
भक्तांसाठी
उभा राही
नदी काठी........३
देह भान
शुध्दं नसे
जप माळ
नित्यं असे.........४
दीनाचा तो
हरि सखा
भक्त जना
प्राणसखा........५
विठू माझी
माऊली तू
जगी मला
सर्वस्व तू........६
गीत तुझे
स्वरताना
भान मला
राहवेना..........७
विठुराया
आस मला
लागली रे
भेटायला..........८
नामघोष
पंढरीचा
मनी जप
विठोबाचा.........९
माय बाप
तूच देवा
ओढ तुझी
लागे जीवा.......१०
