नवी सुरुवात
नवी सुरुवात
1 min
7
नवी सुरुवात, नव्या दिवसाची सोबत नवी, नव्या शब्दांची
कोऱ्या मनाची कोरी पाने
सुगंधी भावना, सुगंधी सुमने
विषय जुने, आशय नवा
संपून पानगळ बहर नवा
नव्या उषेची नवी किरणे
हृदय मंदिरी काव्य तोरणे
शब्द नवे, अर्थ नवे
नव्या आयुष्याचे गीत नवे
प्रकाशमान हृदयी नव्याने उजळती नव संकल्प दिवे ..