नको येऊ परतुनी आता
नको येऊ परतुनी आता
1 min
266
नको येऊ परतुनी तु
आठवणी जुन्या जागवायला
आत्तांच मन शांत झालयं
नको येऊ दुखवायला
हास्य गालावर ठेवुनी
जगात वावरत असते मी
एकांतात मात्र
तुलाच आठवत असते मी
मिटवायला नाव तुझं
आधीचं खुप वेळ गेला
नको येऊ परतुनी आता
हदयावरी राज्य करायला
विसरून जा मजला आता
विनंती करते तुजपाशी मी
सुखी राहा सारया जन्मी
तुझं मार्गातुनी दुर सरते मी
नको येऊ सांगता सांगता
तुझ्यावरचं कविता लिहुन गेले
अविस्मरणीय त्या क्षणांत
पुन्हा मी हरवुन गेले
