नित्याचा माझा छंद
नित्याचा माझा छंद
1 min
328
मतलबी ही दुनिया सारी
माणुसकीचा नाही गंध
संपले तुमचे काम मग
त्यांचा दरवाजा होतो बंद
स्वत: ला कोंडून घेऊन
शब्दांशी खेळत बसतो
कधी रुसतो कधी हसतो
तरीही शब्दांशी च बोलत बसतो
लखलखता खंजीर शब्दांचा
कधी काळीज चिरीत जातो
कुसुमांचा सुवास घेऊन कधी
मंद धुंद मनी दरवळतो
शब्दांच्या खेळातच मी
होत जातो असा बेधुंद
लागला लळा शब्दांचा
झाला नित्याचा माझा छंद
