STORYMIRROR

Deepali Mathane

Others

3  

Deepali Mathane

Others

निसर्गाचे रूप मनोहर

निसर्गाचे रूप मनोहर

1 min
233

 निसर्ग नटला अवघा

हिरवा शालू धरणी ल्याली

वनराई ही सुखावलेली

श्रुंगार रसपान प्याली

    नदी,झरे तुडुंब भरले

   खळखळ नादही घुमला

   काननी पशू-पक्षी गाती

   मंजूळस्वर कानी आला

झाडे-झुडपे फुलपाखरे

अवचित रानी बागडती

धबधब्याच्या गीतासह

अवघे सूर हे आवडती

    सृष्टीचे ते रूप मनोहर

    परमात्म्याचे रूप दिसे

  कणकणातील निसर्ग सौंदर्य

    नयनी प्रत्येकाच्या वसे

निसर्गाचा अनमोल ठेवा

 आजन्म करूया जतन

निसर्गाच्या सहाय्याने निघे

उजळूनी अपुले प्राक्तन


साहित्याला गुण द्या
लॉग इन