Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manik Nagave

Others

3  

Manik Nagave

Others

निर्मळ जीवन

निर्मळ जीवन

1 min
211


असावे निर्मळ |

तन मन धन |

होईल जीवन |

आनंदाचे || १ ।।


द्वेष मोह राग |

सोडावा मत्सर |

आपण सत्वर |

सुधारण्या || २ ।।


दे सहानुभूती |

एकमेकाप्रती |

सफल जगती |

होण्यासाठी || 3 ।।


आदर करावा |

सर्वांचा मानवा |

सोडुनी दानवा |

पाठीमागे || ४ ।।


मानवा जन्म हा |

एकदाच मिळे |

का न तुला कळे |

रीतभात || ५ ।।


सत्याचीच कास

धरावी नेहमी |

तू मानवप्रेमी |

असावास || ६ ।।


पाळ मानवता |

सदैव तू अंगी |

ईश्वराच्या रंगी |

रंगून जा || ६ ।।


शांतता या जगी ।

नांदावी नेहमी ।।

कशाची ना कमी ।

असावीच ।। ७ ।।


नको प्राणीहत्या ।

पाळा भूतदया ।।

सिद्ध पाळावया ।

होऊयात ।। ८ ।।


अनाथांच्या प्रती ।

गरज प्रेमाची ।।

सहानुभूतीची ।

जगतात ।। ९ ।।


प्रेमाच्या या गावा ।

जाऊया सगळे ।।

रुप हे आगळे ।

पाहुयात ।। १० ।।


Rate this content
Log in