नातं भावाबहिणीचं
नातं भावाबहिणीचं
आहेस रे तू
माझ्यापेक्षाही लहान
पण रूबाब करतो असा
की वाटू लागते
आहेस माझ्यापेक्षाही मोठा तू
जेव्हा पप्पा रागवतात
तेव्हा काही न बोलता
क्षणांनंतरच जवळ येऊन
विचारतो तू
काय झालं गं दीदी
तुला असं रडायला
तुझ्यासोबत खेळायला
खुपच मज्जा येते रे
तुझ्या चेहरयावरचा तो आनंद पाहून
मलाही छान वाटत रे
मारतोही तुच, रागावतोही तूच
पण क्षणांतच, जवळही घेतोही तूच
माझा मित्र ही तूच
माझी मैत्रीणही तूच
माझ्यासाठी माझी जिंदगी आहेस रे तू
देवाने पाठवलेला हिरा आहेस रे तू
किती सुंदर नातं आहे हे आपल्यातलं
असचं नातं आपलं
सुंदररित्या जपुन ठेवू
एकमेंकांच्या साथीने
घराला सांभाळुन ठेवू
घराला सांभाळुन ठेवू
