नाही संपत..
नाही संपत..
1 min
174
नाही संपत तो प्रवास
पण हवासा करणं तर
आपल्या हातात आहे.
प्रवास जगायचा असतो
प्रवास संपतच असतो
कंटाळवाणा झाला तर
तो संपतच नाही
भरभरून जगल्यावर
कधी संपला तेच कळत नाही
नाही संपत रडगाणं
म्हणून काय गायचंच नाही गाणं
नाही जुळत प्रेम
म्हणून काय आठवणीही
नाही करायचा फ्रेम
नाही जगण्याची आस
म्हणून मृत्यूला
का संधी द्यायची.
